एफआरपी जाहीर करण्यास चार साखर काखान्यांची चालढकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:20+5:302020-12-05T04:27:20+5:30
परभणी : जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी ४ साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपी जाहीर ...
परभणी : जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी ४ साखर कारखान्यांनी अद्याप एफआरपी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या कारखान्यांच्या सकारात्मक घोषणेच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी ऊस देण्यास प्रारंभ केला आहे.
परभणी तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मीनृसिंह शुगर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला आहे; परंतु या कारखान्याने अद्याप एफआरपीची रक्कम जाहीर केलेली नाही. मात्र, इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल, असे कारखान्याने सांगितले. पाथरी येथील रेणुका शुगर्स व लिंबा येथील योगेश्वर शुगर्स या दोन्ही कारखान्यांनीही एफआरपी जाहीर केलेला नाही. याबाबत माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगितले. सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शुगर्स कारखान्याने गतवर्षी गळीत हंगाम झाला नसल्याने एफआरपी निश्चित केली नसल्याचे सांगितले. पूर्णा तालुक्यातील बळीराजा साखर कारखान्याने मात्र २६३२ रुपयांची एफआरपी जाहीर केली आहे.