मार्गदर्शन मागवूनही सीएचओंच्या नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:04+5:302020-12-29T04:15:04+5:30

या संदर्भात मराठा शिवसैनिक सेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने समूदाय आरोग्य अधिकारी या ...

Manipulation of officers for appointment of CHOs despite seeking guidance | मार्गदर्शन मागवूनही सीएचओंच्या नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची चालढकल

मार्गदर्शन मागवूनही सीएचओंच्या नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांची चालढकल

Next

या संदर्भात मराठा शिवसैनिक सेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने समूदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी परीक्षा घेतली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी ६ महिन्यांसाठी प्रशिक्षण म्हणून कोविड व नॉनकोविड रुग्णांसाठी सेवाही करुन घेण्यात आली. मात्र त्यानंतरही याउमेदवारांना नियुक्ती आदेश दिले नाहीत. जिल्ह्यातील पात्र एससीबीसी प्रवर्गातील समूदाय आरोग्य अधिकारी यांना रुजू करण्याचे आदेश दिले नसल्याने या अधिकाऱ्यांवर अन्याय झाला आहे. प्रशिक्षणाच्या वेळी बिंदू नामावलीचा विचार केला असल्याने पुन्हा नियुक्ती आदेश देताना बिंदू नामावलीचा विचार करु नये, असा उल्लेख शासनाच्या पत्रात असतानाही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी मात्र त्यांची बदली होण्यापूर्वी एससीबीसी प्रवर्गात सीएचओ उमेदवारांवर अन्याय केला आहे. त्यातच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र या संदर्भात कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे एससीबीसी प्रवर्गातील सीएचओ उमेदवारांना कोण न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे २७ सीएचओ उमेदवारांना सध्या नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. तेव्हा २७ एससीबीसी प्रवर्गातील सीएचओंना तात्काळ रुजू करुन घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मराठा शिवसैनिक सेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास आवचार, सुनील आवचार, अर्जून पोंडे, विष्णू गाडे, अफसरभाई, ओंकार जावळे, लहू शिंदे, विजय शिंदे, शिवाजी भालेराव, जीवन स्वामी, बाळासाहेब सामाले, यशवंत रेखणे, रामकिशन हजारे, राजकुमारसिंग टाक आदींनी केली आहे.

इतर जिल्ह्यात आदेश

सीएचओंना आदेश देताना एससीबीसी पात्र उमेदवारांना इतर जिल्ह्यामध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Manipulation of officers for appointment of CHOs despite seeking guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.