मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:06+5:302020-12-23T04:14:06+5:30

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था ...

Manpa undertook cleaning work | मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

मनपाने हाती घेतली स्वच्छतेची कामे

Next

स्टेडियम भागातील स्वच्छतागृह बंद

परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स भागातील व्यापारी आणि नागरिकांसाठी काही महिन्यांपूर्वी मनपाने बांधलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. जलतरणिकेला लागून या स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून नेले आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची सुविधाही बंद झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहाचा कोणताही उपयोग होत नसून, केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभ उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. तीन वर्षांपासून या कामाला प्रारंभ करण्यात आला. शहरातील इतर जलकुंभ बांधून पूर्ण झाले. मात्र राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. हे काम पूर्ण झाल्यास शिवाजीनगर, संभाजीनगर, शंकरनगर व इतर वसाहतीतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

राहाटीजवळ पुलाच्या कामाला प्रारंभ

परभणी : वसमत रस्त्यावरील राहाटी येथे नवीन रुंद पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी झिरो फाट्याच्या दिशेने नांदगावजवळ खोदकाम केेले जात असून, पूल उभारणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत हे काम केले जात आहे. दरम्यान, काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करा

परभणी : शहरात नळ योजनेद्वारे ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असतानाही नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांसाठी पाण्याची साठवण करण्याची तयारी नागरिकांना करावी लागत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असतानाही पाण्याची समस्या कायम आहे. नागरिकांना दोन दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन मनपाने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

कालव्यातील गाळ उपसण्याची मागणी

परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. पाटबंधारे विभागाने या कालव्यातून एक पाणी आवर्तन दिले आहे. त्याचा कालावधी पूर्ण झाला असून, कालव्यातील गाळ आता उघडा पडला आहे. पुढील पाणी आवर्तन टेलपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Manpa undertook cleaning work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.