'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

By ज्ञानेश्वर भाले | Published: September 17, 2022 05:41 PM2022-09-17T17:41:40+5:302022-09-17T17:43:07+5:30

marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली.

marathawada muktisangram din:Then why are we called; A freedom fighter asked Minister Atul Sawe to answer | 'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

'मग आम्हाला बोलावले कशाला'; मंत्री अतुल सावेंना विचारला स्वातंत्र्यसैनिकाने जाब

Next

परभणी : आम्ही जिवाचे रान करून मराठवाड्याला निजामापासून मुक्त केले. गुलामगिरी काय असते, याची कल्पना आपणास येणार नाही. त्यामुळे तुमच्यासह इतर नागरिक जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत, ते आमच्या सारख्या अनेकांच्या त्याग आणि बलिदानामुळेच. पण आज सरकार, प्रशासन आमचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी कमी पडत असल्याची खंत स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी मंत्री अतुल सावे यांच्याकडे व्यक्त करत त्यांना याबाबत जाब विचारला. परभणी शहरातील राजगोपालाचारी उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या (marathawada muktisangram din) पार्श्वभूमीवर झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यसैनिकाने आपली खदखद मंत्री सावे यांच्यासह इतरांकडे बोलून दाखवली.

परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण मकरंद यांनी आपल्या अडचणी मंत्र्यांसमोर मांडल्या. आजचे प्रश्न, सुविधा, योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आमचे प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. घरासह वैयक्तिक योजनेच्या अनुषंगाने आमच्या सोबत दुजाभाव होतो, असा आरोप लक्ष्मण मकरंद यांनी केला. आता बोटावर माेजण्या इतकेच स्वातंत्र्यसैनिक हयात आहे, किमान त्यांचे प्रश्न तरी सरकारने तातडीने साेडवावे, अशी अपेक्षा त्यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली.

मग आम्हाला बोलावले कशाला
परभणीत झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान वीरपत्नी आणि मातांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायास अश्रूंच्या रुपाने वाट मोकळी करून दिली. आमच्या परिवारातील सदस्यांनी जिवाची बाजी लावत देश रक्षणासाठी आत्मबलिदान दिले. पण अशा शासकीय कार्यक्रमादरम्यान आम्हाला योग्य तो मान, सन्मान मिळत नाही, मग बोलवता कशाला, अशी खंत शहीद अक्षय यांची आई सुनीता गोडबोले, वीर पत्नी अनुराधा गणेश शहाणे, वीरपत्नी अंजना बालाजी अंभोरे यांनी मंत्री सावे यांच्याकडे व्यक्त केली. या कार्यक्रमातही मंत्री सावे संबंधितांना न भेटता निघाले हाेते. पण अनिता सरोदे यांनी संबंधितांची भेट मंत्री सावे यांच्याशी घालून दिली. कुठल्याही कार्यक्रमात आमच्यासोबत असेच होत असल्याचा आरोप यावेळी वीर माता, वीर पत्नी यांनी उपस्थित केला.

Web Title: marathawada muktisangram din:Then why are we called; A freedom fighter asked Minister Atul Sawe to answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.