मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:32 AM2021-02-28T04:32:53+5:302021-02-28T04:32:53+5:30
नूतन विद्यालयात कार्यक्रम सेलू येथील नूतन विद्यालयात मराठी राजभाषा दिन व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
नूतन विद्यालयात कार्यक्रम
सेलू येथील नूतन विद्यालयात मराठी राजभाषा दिन व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक वानरे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून कवयत्री करुणा बागले, पर्यवेक्षक रघुनाथ सोन्नेकर, नारायण सोळंके, डॉ. काशीनाथ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वर्षा कदम यांनी तर आभार लक्ष्मण वांगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक लिंबेकर, सच्चिदानंद डाखोरे, शैलेजा कौटकर आदींनी पुढाकार घेतला.
वस्सा येथे कार्यक्रम
वस्सा: जिंतूर तालुक्यातील वस्सा येथील महात्मा फुले विद्यालयात शनिवारी मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मच्छिंद्र लुटे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक भास्कर दराडे, बापूराव सोनवणे, रमेश वाघे, कृष्णा राऊत, सुरेश काळे, विलास कोल्हाळ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन लक्ष्मण बकरे यांनी तर आभार तान्हाजी काळे यांनी मानले.
गंगाखेड बसस्थानकात कार्यक्रम
गंगाखेड : येथील बसस्थानकात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किशनराव कऱ्हाळे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून लेखा परीक्षण अधिकारी प्रकाश पानढवळे, अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंतराव गेजगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास किशनराव पौळ, विजयकुमार पुरी, रफीक मोगल, रामप्रसाद कुंडगीर, डी.जी. शिंगारे, शंकरराव सानप, विलास साळवे आदींची उपस्थिती होती.