१४ टेबलवरून होणार साहित्य वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:14+5:302021-01-14T04:15:14+5:30
सेलू तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींसाठी ...
सेलू तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी १२ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी १७४ वार्डात मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी १७४ मतदान केंद्राध्यक्ष व ५३८ मतदान अधिकारी अशा एकूण ७१२ कर्मचाऱ्यांची ग्रामपंचायत निहाय नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी संबधित कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी ८ वाजता तहसील कार्यालयात मतदान यंत्र व अन्य साहित्य वितरित केले जाणार आहे. या अंतर्गत ईव्हीएम मशीन वितरणासाठी ३ टेबल व ईतर साहित्यासाठी ११ अशा १४ टेबलवरून साहित्य वितरण होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेकरिता २३ अधिकाऱ्यांची झोनल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत चव्हाण, आर.आर.पाल व सपोनी विजय रामोड यांनी ५ अधिकारी, ३६ पोलीस कर्मचारी व ६० होमगार्ड यांचा निवडणूक कामी पोलीस बंदोबस्त लावला आहे. संवेदनशील असलेल्या वालूर, आहेर बोरगांव व शिराळा येथे पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे, अशी माहिती स.पो.नि.विजय रामोड यांनी दिली.