गणित शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:14 AM2020-12-23T04:14:37+5:302020-12-23T04:14:37+5:30

१० हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पालम : तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तालुक्यातील ...

Mathematics teachers honored | गणित शिक्षकांचा सत्कार

गणित शिक्षकांचा सत्कार

Next

१० हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी

पालम : तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तालुक्यातील एका जिनिंगवर सध्या दररोज फक्त १०० शेतकऱ्यांना बोलाविले जात आहे. त्यामुळे कापूस खरेदीला दिरंगाई होत आहे. कापूस खरेदी केंद्रे वाढविण्याची मागणी होत आहे.

तूर पिकाची विमा कंपनीकडून पाहणी

पालम : तालुक्यातील ९ गाव शिवारातील तुरीच्या पिकांचे अज्ञात रोगाने नुकसान झाले आहे. या नुकसानीची शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर रिलायन्स विमा कंपनीकडून पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी ९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. मदतीसाठी या कर्मचाऱ्यांचा अहवाल महत्वाचा आहे.

वृक्षतोडीला आळा घालण्याची आवश्यकता

देवगाव फाटा : सेलू तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. तोडलेले वृक्ष शहरात वाहनातून सर्रासपणे आणले जात आहेत. असे असताना या विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्यास वेळ मिळत नाही. विशेष म्हणजे वृक्षतोडीबाबत जनजागृती करण्याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेले आहे.

शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव

देवगाव फाटा: सेलू शहरात शासकीय कार्यालयाची संख्या जवळपास २२ आहे . दोन ते तीन कार्यालय सोडले तर बहुतेक सर्व ठिकाणी कार्यालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. कार्यालय परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. भिंतीवरही पान खाऊन पिचकाऱ्या मारण्यात आल्या आहेत. तसेच येथे दुर्गंधी येत असून कार्यालय प्रमुखांनी स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शाळांकडे विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ

पालम : पालम शहर व तालुक्यात नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत; परंतु, या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे. कोरोनाची परिस्थिती अद्याप आटोक्यात आली नसल्याने पालक त्यांना शाळेत पाठविण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. शाळेमध्ये विद्यार्थी आल्यानंतर विद्यालयाकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

Web Title: Mathematics teachers honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.