परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:16 AM2018-01-24T00:16:38+5:302018-01-24T00:16:53+5:30

राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़

Meeting in Parbhani district: State government's addiction to power: Ajit Pawar | परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

परभणी जिल्ह्यात सभा : राज्य सरकारला चढली सत्तेची नशा-अजित पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी/सेलू : राज्य आणि केंद्रातील भाजपाच्या सरकारला सत्तेची नशा चढली आहे़ हे सामान्यांसाठी परवडणारे नसून, महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे़ शेतकºयांचे प्रश्न या सरकारला कधी समजलेच नाहीत़ मुठभर लोक श्रीमंत झाले पाहिजेत, अशी सरकारची धोरणे आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाथरी व सेलू येथील जाहीर सभेत केला़
२३ जानेवारी रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रे दरम्यान जाहीर सभा घेण्यात आली़ तर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सभा पार पडली़
या दोन्ही सभांना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, चित्राताई वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, राजेश टोपे, बसवराज पाटील, आ़सतीश चव्हाण, आ.विक्रम काळे, आ़प्रदीप नाईक, आ़जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आ़बाबाजानी दुर्राणी, आ़विजय भांबळे, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, आ़शशिकांत शिंदे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अजिंक्य राणा पाटील, माजी खा़ गणेशराव दुधगावकर, माजी खा़ सुरेश जाधव, संग्राम कोते, जि़प़चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी आ़ व्यंकटराव कदम, दशरथ सूर्यवंशी, सारंगधर महाराज, डॉ़ संजय रोडगे, जि़प़ सभापती अशोक काकडे, गटनेते अजय चौधरी, जि़प़ सदस्य राजेंद्र लहाने, विनायक पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, नानासाहेब राऊत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती़
पवार म्हणाले, राज्यातील सरकार सर्वच बाबीत अपयशी ठरले आहे़ समाजासमाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे़ बेरोजगारी वाढली आहे़ पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळण्याऐवजी विमा कंपनीच्याच घशात १४ हजार कोटी रुपये घातले़ त्यामुळेक शेतकरी अस्वस्थ आहेत़ जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला़
कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पोलीस खात्याचाही पूर्वीप्रमाणे दरारा राहिला नाही़ बंदोबस्त करायचा सोडून पोलीस आमच्या सभा व रॅलीचे शुटींग करण्यात मग्न आहेत़ एका पोलीस कर्मचाºयाची पत्नीच चोरांच्या टोळीत सापडली़ तिच्याकडे दोन कोटींचे घबाड सापडले़ यावरून कायदा व सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती दिसून येते़ थेट सरपंच निवडीच्या निर्णयावरही टीका करीत केवळ पैशावाल्या लोकांसाठी निर्णय झाल्याचे ते म्हणाले़ भाजपचे सरकार कायदे व नियम बदलत असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याचे पवार यांनी सांगितले़
पाथरीतील सभेच्या यशस्वीतेसाठी अनिल नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, जुनेद खान दुर्राणी, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, चक्रधर उगले, अनिल पाटील, सुनील उन्हाळे, मोईज अन्सारी, हतीम अन्सारी, राजेश ढगे, रमेश तांगडे, हन्नानखान दुर्राणी, राजीव पामे, नितेश भोरे, अलोक चौधरी आदींनी प्रयत्न केले़
शिवसेनेची अवस्था केविलवाणी
४अजित पवार यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवरही निशाणा साधला़ शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी असते़ शिवसेनापूर्वी वाघासारखी होती़ परंतु, आता शेळी, ससाही नाही तर कासव झाली आहे़
सरकार झोपेतच- मुंडे
४विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खुमासदार शैलीत राज्य सरकारवर टिका केली़ महाराष्ट्र सरकार हे रामदेव बाबाचे सरकार झाले आहे़ पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत़ महागाई वाढत आहे़ जनता त्रस्त असताना सरकार मात्र झोपेत असल्याचा आरोप त्यांनी केला़

Web Title: Meeting in Parbhani district: State government's addiction to power: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.