कामगारांच्या नोंदणीसाठी बोलावली व्यापाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:14 AM2021-07-11T04:14:03+5:302021-07-11T04:14:03+5:30
जिल्ह्यातील विविध कामगारांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. विविध दुकाने, कंपन्या, कारखाने, ...
जिल्ह्यातील विविध कामगारांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. विविध दुकाने, कंपन्या, कारखाने, हॉटेल, रुग्णालये या ठिकाणी काम करणाऱ्या हंगामी आणि कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांची नोंदणी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. ही नोंदणी न झाल्याने कामगार विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. आस्थापनांच्या मालकांनी नोंदणी करणे गरजेचे असताना त्याबाबत मात्र उदासीनता बाळगली जात असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे यांनी हा प्रश्न उचलला. यावर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधणे आदींसह सर्व व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे.