कुपटा येथील ४६८ गावरान कोंबड्यांना दयामरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:09+5:302021-01-17T04:16:09+5:30
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील घटनेनंतर कुपटा येथील ५०० कोंबड्या दगावल्या. त्यानंतर या मृत कोंबड्यांचा नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे ...
परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावातील घटनेनंतर कुपटा येथील ५०० कोंबड्या दगावल्या. त्यानंतर या मृत कोंबड्यांचा नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेकडे अहवाल पाठविण्यात आले होते. भोपाळ येथील अहवाल पॉझिटिव आल्यानंतर येथील ५०० कोंबड्या बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पशुवैद्यकीय प्रशासनाने १६ जानेवारी रोजी गावात दाखल होऊन गाव परिसरातील १ किमी अंतरावरील पाळीव पक्षी नष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुपटा येथील २२ पशुपालकांच्या ४६८ कोंबड्यांना पकडून त्यांना दयामरण देण्यात आले. यावेळी डॉ. पी.डी.कुलकर्णी, डॉ. भालेराव, डॉ. सय्यद मशीन, डॉ. शिरीष गळाकाटू, आरती शिंदे, सी. एस. बेंद्रे, गोविंद बहिरट, तन्वीर शेख, प्रकाश वाठोरे, डॉ. दीपक साळवे, तलाठी प्रवीण माटे, ग्रामसेवक नरेश अंभोरे, सरपंच अंकुश सोळंके, गोपिनाथ सोळंके, राजू सोळंके आदींची उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय समितीने प्रती पक्ष्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून ९० रुपये देण्याचे ठरविले आहे. हे पैसे पशुपालकांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्यामुळे पशुपालकांनी कोंबड्या मारण्यासाठी स्वतः पुढे येऊन सहकार्य करावे.
उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी सेलू.