वसमत तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; कोणतीही हानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:36 PM2022-12-22T15:36:08+5:302022-12-22T15:36:23+5:30
आज दुपारी २ वा ८ मिनिटाला पुन्हा याचा सौम्य धक्के अनुभवण्यास आले.
- इस्माईल जहागिरदार
वसमत (हिंगोली): तालुक्यातील अनेक गावांना गत सात ते आठ वर्षापासून भूकंपाचे सौम्य धक्के अधूनमधून जाणवत आहेत. आज दुपारी २ वाजून ८ मिनिटाला तालुक्यातील अनेक गावांत भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिरळी,वापटी, कुपटी,डोनवाडा, कुरुंदा, सेलू , आंबा यासह आदी गावात सात ते आठ वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असतात. जमीन हादरणे, भूगर्भातून आवाज येणे, असे प्रकार घडत आहेत. आज दुपारी २ वा ८ मिनिटाला पुन्हा याचा सौम्य धक्के अनुभवण्यास आले. खाजनापुर वाडी,आंबा, कुरुंदा यासह इतर गावांना भुगर्भातुन आवाज येत जमिन हादरत भुकंपाचा धक्का जाणवला. यावेळी कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती तलाठी एन गिते यांनी दिली.