परभणीत होणार सैन्य भरती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:35 AM2019-11-24T00:35:24+5:302019-11-24T00:35:29+5:30

औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Military recruitment rally to be held in Parbhani | परभणीत होणार सैन्य भरती मेळावा

परभणीत होणार सैन्य भरती मेळावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : औरंगाबाद येथील सैैन्यभरती कार्यालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने परभणीत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
परभणी येथे आयोजित या भरती मेळाव्यात नंदूरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने ६६६.्नङ्म्रल्ल्रल्ल्िरंल्लं१े८.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर १९ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन सैन्यभरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले आहे.
दरम्यान, सैन्य भरतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जमवाल यांनी मेळाव्याच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह कृषी विद्यापीठ, महानगरपालिका आणि पोलीस कल्याण कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. जमवाल म्हणाले, भारतीय सैन्य दलाकडून परभणी जिल्ह्यात ४ ते १३ जानेवारी २०२० या कालावधीत सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडस्मन या पदासाठी भरतीचे आयोजन केले आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात हा मेळावा होणार आहे. २१ नोव्हेंबरपासून ते १९ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या प्रवेश पत्राशिवाय सैन्य भरतीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आॅनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सैन्य भरतीच्या काळात शहरात व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा घेऊन विविध ठिकाणाहून येणाºया उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना विभागप्रमुखांना दिल्या.

Web Title: Military recruitment rally to be held in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.