गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलाने संपवले जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:08 IST2024-03-01T12:08:19+5:302024-03-01T12:08:28+5:30
याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलाने संपवले जीवन, कारण अस्पष्ट
-अनिल शेटे
गंगाखेड : शहरातील राणीसावरगाव रोडवरील नविन शनिवार बैल बाजार परिसरातील चिंचेच्या झाडाला ओंकार अनिल भिसे या १७ वर्षीय ( रा. भगवानबाबा नगर ) मुलाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
भगवानबाबा नगर येथील दत्तमंदिर परिसरात राहणारा ओंकार अनिल भिसे हा व्यंकटेश विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी ओंकार याने राणीसावरगाव रोडवरील नविन शनिवार बैल बाजार परिसरातील झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
नागरिकांनी याची माहिती ओंकारच्या वडिलांना दिली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहचले होते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यवस्थ अवस्थेतील ओंकारला उपजिल्हारूग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचा कारणाचा अद्याप उलगडा झाला नाही.