परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:18 AM2018-04-11T00:18:58+5:302018-04-11T00:18:58+5:30

तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.

MMP's clean-staff strike for Parbhani's salary | परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर

परभणीत वेतनासाठी मनपाचे सफाई कर्मचारी संपावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तीन महिन्यांचे थकलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी महापालिकेतील सफाई कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छतेची कामे ठप्प झाली आहेत.
१४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पगार तीन महिन्यांपासून रखडले आहेत. विशेष म्हणजे वेतनाच्या मागणीसाठी ३ एप्रिल रोजी संघटनेचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकाºयांमध्ये चर्चा झाली. अधिकाºयांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासनही दिले; परंतु, अद्यापपर्यंत मागण्यांची पुर्तता झाली नाही. सणासुदीच्या काळात वेतन नसल्याने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कर्मचाºयांच्या इतर मागण्याही प्रलंबित असल्याने स्वच्छता विभागातील कायम व रोजंदारी कामगारांनी १० एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. येथील महापालिकेच्या कार्यालयात स्वच्छता कर्मचाºयांनी ठिय्या मांडून वेतनाची मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार कामगारांनी बोलून दाखविला. कायम व रोजंदारी सफाई कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करावे, सफाई कामगारांना १२ व २४ वर्षांच्या पदोन्नतीसाठी जात पडताळणीची अट रद्द करावी, रोजंदारी कामगारांना विना अट सेवेत कायम करावे, सफाई कामगारांना आकृतीबंधानुसार सेवा ज्येष्ठता, शैक्षणिक पात्रतेनुसार मुकादम, शिपाई, वाहन चालक, लिपीक पदावर पदोन्नती द्यावी, दुसºया व चौथ्या शनिवारी सुटी द्यावी, कामगारांना घरे बांधून द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. परभणी शहर महानगरपालिका सफाई कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनुसयाबाई जोगदंड, सचिव के.के. भारसाखळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

Web Title: MMP's clean-staff strike for Parbhani's salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.