हक्काच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी राबविणार चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:13 AM2021-06-21T04:13:42+5:302021-06-21T04:13:42+5:30
काय आहेत संघटनेच्या मागण्या कोरोना पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या अधिकारी ते कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना कमीत कमी अकरा महिन्यांचे आदेश ...
काय आहेत संघटनेच्या मागण्या
कोरोना पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या अधिकारी ते कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना कमीत कमी अकरा महिन्यांचे आदेश द्यावेत, या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण व आरोग्य विभागातील नॉनकोविडची कामे करून घ्यावीत. आरोग्य विभागात केली जाणारी नोकर भरती ही कंत्राटी, हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या योग्य त्या पदास आवश्यक असणाऱ्या विहित शैक्षणिक अर्हतेप्रमाणे खात्यांतर्गत परीक्षा घेऊन करावी, सर्व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, तथा शहरी आरोग्य अभियानांतर्गत कोविड, नाॅनकोविड व तत्सम विभागात समावेश करावा, सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, कर्मचाऱ्यांच्या सर्व कुटुंबीयांना वयाच्या अटीविना लसीकरण करावे, आयुष विभागाच्या वेतनविषयक शिफारसीची तत्काळ अंमलबजवणी करावी, सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.