सोनपेठ येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदी पात्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:57 PM2018-07-27T16:57:30+5:302018-07-27T16:59:17+5:30

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील विटा (खु.) येथील गोदावरी नदीपाञात आज सकाळी ११ वाजता अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले.

Movement in the Godavari river front for the Maratha reservation at Sonpeth | सोनपेठ येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदी पात्रात आंदोलन

सोनपेठ येथे मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदी पात्रात आंदोलन

googlenewsNext

सोनपेठ (परभणी ) : मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील विटा (खु.) येथील गोदावरी नदीपाञात आज सकाळी ११ वाजता अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. यावेळी एका युवकाने मुंडन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध केला. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी आंदोलनकरण्यात आले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गोदावरी नदीपात्रात अर्धनग्न अवस्थेत जल आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तहसीलदार जिवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले. यानंतर एका आंदोलकाने मुंडन करून सरकारचा निषेध केला. आंदोलन स्थळी प्रशासनाकडून योग्य ती उपाय योजना करण्यात आली होती. यात उत्तम पोहणारे जीवरक्षक, होड्या, रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता. पोनि सोपान सिरसाट यांच्यासह पोलीस कर्मचारी मोट्या प्रमाणात तैनात होते. 

Web Title: Movement in the Godavari river front for the Maratha reservation at Sonpeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.