कृषी साहाय्यकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:23 AM2021-02-27T04:23:52+5:302021-02-27T04:23:52+5:30
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहायक अधीक्षक पदावर कार्यरत असलेले एस.आर. रेंगे हे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पत्रावर पेनने खाडाखोड करणे, ...
येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सहायक अधीक्षक पदावर कार्यरत असलेले एस.आर. रेंगे हे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पत्रावर पेनने खाडाखोड करणे, कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक खराब करणे तसेच मानसिक त्रास कर्मचाऱ्यांस देत आहेत. रेंगे हे अधिकाराचा गैरवापर करत असल्याने शेतकऱ्यांचे रोजगार हमी व इतर योजनेची रक्कम वेळेवर मिळत नाही. तसेच कार्यालयात आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात. कर्मचारी आणि शेतकरी यांना चांगली वागणूक देत नाहीत. तसेच कृषी सहायकांचे मानसिक व आर्थिक खच्चीकरण करत असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून २५ फेब्रुवारीपासून कृषी साहाय्यक यांनी कार्यवाही होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांना दिलेल्या निवेदनावर कृषी सहायक एस.डी. सोळंके, बी. डी. आवटे, डी. एन. फुलारी, एस. टी. शेळके, व्ही. डी. कुंभार, ए. बी. घुमरे, आर. आर. डोंबे, एस. के. वारकड, पी. पी. वंटलवाड, एस. ए. सोळंके, व्ही. एस. जालकर, एस. बी. बोईनवाड, पी. पी. रोडगे यांच्या स्वाक्षऱ्या असून कृषी विभागाचे काम ठप्प झाले आहे.