महावितरण कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:32 AM2021-02-21T04:32:49+5:302021-02-21T04:32:49+5:30

परळगव्हाण येथे कार्यक्रम परळगव्हाण येथील ग्रामपंचायतीत शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरपंच मोतीराम शिंदे, उपसरपंच प्रभाकर शिंदे, सदस्य विठ्ठलराव ...

MSEDCL Office | महावितरण कार्यालय

महावितरण कार्यालय

Next

परळगव्हाण येथे कार्यक्रम

परळगव्हाण येथील ग्रामपंचायतीत शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी सरपंच मोतीराम शिंदे, उपसरपंच प्रभाकर शिंदे, सदस्य विठ्ठलराव जावळे, राजेश कांबळे, पद्माकर शिंदे, दादाराव शिंदे, अच्युतराव शिंदे, भागवत शिंदे, निवृत्ती शिंदे, श्रीकांत शिंदे, अमोल अवचार, लक्ष्मण कांबळे, आदींची उपस्थिती होती.

सावता सेना

परभणी : येथील सावता सेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंगेश सोनुने, राम जाधव, रवी डुबे, सुभाष गायकवाड, बंटी साबणे, डाॅ. बाळासाहेब लंगोटे, ॲड. विनोद अंभोरे, आदींची उपस्थिती होती.

सिंगणापूर येथे कार्यक्रम

परभणी : तालुक्यातील सिंगणापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अंगद सोगे, प्रसाद मुरुंबकर, दिलीप गायकवाड, मोहन खिल्लारे, वैभव खिल्लारे, आदिनाथ खिल्लारे, मोतीराम आंधळे, संजय गायकवाड, आदींची उपस्थिती होती.

वंचित बहुजन आघाडी

परभणी : येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संपत नंदनवरे, शेषराव जल्हारे, अशोक वायवळ, राजेश बालटकर, संजय आदोडे, अमोल वाघमारे, भोला सिंग, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

खानापूर येथे कार्यक्रम

परभणी : तालुक्यातील खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. ऋतुराज थोरात, वेदान्त वैद्य, श्रेयस थोरात, कृष्णा थोरात, सूरज थोरात, करण जाधव, प्रेम थोरात, आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: MSEDCL Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.