परभणी जिल्ह्यात बिल न देताच महावितरणची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:16 AM2021-03-18T04:16:45+5:302021-03-18T04:16:45+5:30

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी ...

MSEDCL recovered without paying the bill in Parbhani district | परभणी जिल्ह्यात बिल न देताच महावितरणची वसुली

परभणी जिल्ह्यात बिल न देताच महावितरणची वसुली

Next

जिल्ह्यात एकाही कृषिपंपाचे रिडिंग घेण्यात आलेले नाही. अंदाजित अव्वाच्या सव्वा बिले देऊन ९६ हजार ८०८ कृषिपंप धारकांकडे १३८६ कोटी रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली आहे. त्याची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

मागील दहा वर्षांपासून महावितरणकडून कृषिपंपाचे कोटेशन घेतले. तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने कधी मीटर रिडिंग घेण्यात आले नाही. मात्र, वर्षाला एकदा मार्च एंडिंगच्या नावाखाली वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून बिलाची रक्कम कळते.

- अनंत बनसोडे, शेतकरी, पिंपळगाव

कृषिपंपाचे कोटेशन घेतले तेव्हापासून आतापर्यंत महावितरण कंपनीच्या वतीने एकदाही विद्युत बिल देण्यात आलेले नाही. मात्र, अव्वाच्या सव्वा बिल नावावर जमा होत आहे. आता या बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून तगादा लावला जात आहे.

- सिद्धू कदम, शेतकरी, आर्वी

महावितरण कंपनीकडून दर महिन्याला विद्युत बिल मिळाले तर हे बिल भरण्यासाठी आम्हाला सोयीचे राहील. मात्र, वर्षभर महावितरणचा कर्मचारी आमच्याकडे फिरकत नाही. वर्षानंतर अंदाजित बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित केला जातो.

- नरसिंग ढेंबरे, शेतकरी, कुंभारी

Web Title: MSEDCL recovered without paying the bill in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.