परभणी मालमत्ताधारकांसाठी महापालिकेची अभय योजना; थकबाकीवर विलंब शुल्कात १०० टक्के सुट

By राजन मगरुळकर | Published: February 29, 2024 05:50 PM2024-02-29T17:50:09+5:302024-02-29T17:50:38+5:30

मालमत्ता करावरील विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्यासाठी अभय योजना लागू

Municipality's Abhay Yojana for Parbhani Property Owners; 100 percent exemption from late fee on outstanding balance | परभणी मालमत्ताधारकांसाठी महापालिकेची अभय योजना; थकबाकीवर विलंब शुल्कात १०० टक्के सुट

परभणी मालमत्ताधारकांसाठी महापालिकेची अभय योजना; थकबाकीवर विलंब शुल्कात १०० टक्के सुट

परभणी : शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे, अशा मालमत्ताधारकांसाठी मनपा प्रशासनाने कर थकबाकीसाठी विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनपा प्रशासनाने अभय योजना लागू केली आहे.

शहर महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी मनपाच्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रमाणात वाढ व्हावी, याकरीता मालमत्ता करावरील विलंब शास्तीत १०० टक्के सुट देण्यासाठी अभय योजना लागू केली आहे. सदर अभय योजना एक मार्च ते ३१ मार्चपर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर अभय योजनेचा लाभ हा केवळ थकीत व चालू आर्थिक वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी भरणा करणाऱ्या मालमत्ताेधारकांना अनुज्ञेय आहे. तर एक एप्रिलपासून सदर सुट लागू राहणार नाही.

या पर्यायांचा करा वापर
नागरिकांनी आपल्याकडील थकीत व चालु वर्षापर्यंतचा मालमत्ता कर एकरकमी महानपालिकेच्या परभणीएमसी.ओआरजी या लिंकचा वापर करून तसेच मागणी बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून, प्रभाग समिती कार्यालयातील कॅश काऊंटरवर किंवा संबंधित वसुली लिपीक यांच्याकडे भरणा करून अभय योजनेचा लाभ घ्याावा, असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.

Web Title: Municipality's Abhay Yojana for Parbhani Property Owners; 100 percent exemption from late fee on outstanding balance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.