धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:38 AM2022-09-06T09:38:28+5:302022-09-06T09:40:49+5:30

परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे.

Murder of MNS city president in Parbhani sachin patil | धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

Next

परभणी-

परभणीमध्येमनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. 

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका पदाधिकाऱ्यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. सचिन पाटील यांना सहकऱ्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. एका उमद्या नेतृत्व गमावल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे. तसंच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यात मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. अद्याप या हत्येप्रकरणी कुणालाही ताब्यात घेतल्याची किंवा अटक करण्यात आल्याची माहिती नाही. महत्वाची बाब म्हणजे सचिन पाटील यांनी कालच गंगाखेड येथे मनसेच्या एका शाखेचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर रात्री हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

सचिन पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना व विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शहरात कार्य केले आहे. सचिन पाटील हे शिवराम नगर भागात राहतात. सोमवारी मध्यरात्री शिवराम नगर भागातील मित्रांसोबत सचिन पाटील गप्पा मारत बसले होते. यावेळी त्यांचा विजय जाधव यांच्यासोबत वाद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यात विजय जाधव यांनी चाकूने सचिन पाटील यांच्या गळ्यावर, मानेवर वार केले. त्यात जखमी सचिन पाटील यांना त्यांच्या भावासह मित्रांनी खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह पोलिस निरीक्षक संदिपान शेळके आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हत्या करणारा आरोपी फरार
घटनेतील आरोपी विजय जाधव हा फरार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. मयत सचिन पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. अद्याप शवविच्छेदन प्रक्रिया झालेली नाही. तसेच गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया ही अजून सुरू करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

Read in English

Web Title: Murder of MNS city president in Parbhani sachin patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.