सातारा येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ गंगाखेड येथे नाभिक समाजाचा मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 07:24 PM2019-01-28T19:24:50+5:302019-01-28T19:26:37+5:30
सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
गंगाखेड (परभणी ) : सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील करपे वाडी तालुका पाटण येथील विद्यार्थिनी भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने (दि. 17) हिची भर दिवसा हत्या करण्यात आली होती. यातील आरोपींची तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सकाळी साडेअकरा वाजता क्रांतिवीर भाई कोतवाल चौक येथून तहसील कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी नायब तहसीलदार किरण नारखेडे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, न्यायालयीन कामकाजासाठी सरकारी वकील म्हणून अॅड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, राज्य गृहमंत्रालयाने कुमारी भाग्यश्री माने हिच्या कुटुंबास भेट देऊन कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत शासनातर्फे द्यावी व दहशतीखाली असलेल्या माने कुटुंबाचे पाटण येथे पुनर्वसन करून पोलिस संरक्षण द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
मोर्चात बालासाहेब पारवे, देविदास नेजे, अशोक डमरे, पांडुरंग नेजे, संभाजी डमरे, बबन नेजे, अंकुश डमरे, दीपक पारवे, शिवा शिंदे, गोविंद कानडे, बालाजी जाधव, विष्णू नेजे, पप्पू राऊत, विष्णू डमरे, राजाभाऊ नेजे, नारायण डमरे, उमेश नेजे, पांडुरंग पहेलवान, ज्ञानेश्वर डमरे, नकुल डमरे, अशोक सुर्वे, शिवाजी डमरे, केशव जाधव, मोतीराम डमरे, शेख उस्मान, लिंबाजी घोबाळे, बालाजी डमरे, उमेश नेजे, गोविंद डमरे, दत्ता कांबळे, विष्णू पारवे, रमेशराव नेजे, सतीश कानडे, गोविंद शिंदे, सदानंद सोनवणे, धोंडिबा कठाळे, किशन तुपेकर, नामदेव शिंदे, बालू घोडके, सुग्रीव हजारे, नामदेव गवळी, भास्कर कानडे, अनिल कांबळे, सचिन पारवे, रामदास शिंदे, गणेश कठाळे, गोपाळ कांबळे, नितीन शिंदे आदींचा सहभाग होता.
पहा व्हिडीओ :