इच्छुक उमेदवाराचे नाव मतदार यादीतून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:49+5:302020-12-24T04:16:49+5:30

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील धनेगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरत असताना एका इच्छुक महिला उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्याची ...

The name of the aspiring candidate disappears from the voter list | इच्छुक उमेदवाराचे नाव मतदार यादीतून गायब

इच्छुक उमेदवाराचे नाव मतदार यादीतून गायब

Next

देवगावफाटा : सेलू तालुक्यातील धनेगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशनपत्र भरत असताना एका इच्छुक महिला उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्याची बाब उघड झाल्याने पॅनलमध्ये गोंधळ उडाला. यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारपासून प्रारंभ झाला. धनेगाव ग्रामपंचायतसाठी शिवकन्या कृष्णा कटारे यांचा नामनिर्देशन अर्ज ऑनलाइन भरत असताना मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याने समोर आले. त्यामुळे पॅनल प्रमुखांसह सर्वांमध्ये एकच गोंधळ उडाला. याबाबत शिवकन्या कटारे यांनी २३ डिसेंबर रोजी तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत नाव होते, तसेच २५ सप्टेंबर २०२० या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतही प्रभाग क्र. २ मध्ये अनुक्रमांक १२४० वर शिवकन्या कृष्णा कटारे यांचे नाव होते; परंतु १४ डिसेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. या अंतिम मतदार यादीतून नाव गायब कसे झाले, असा सवाल या तक्रारीत करण्यात आला असून, चौकशी करून नाव यादीत सामावून घ्यावे, तसेच नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवकन्या कृष्णा कटारे यांनी केली आहे.

धनेगाव येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून विजय जोशी यांच्याशी संपर्क साधला असता शिवकन्या कटारे यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याबाबत कोणताही अर्ज आला नव्हता, असे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत मतदार यादी गावात प्रसिद्ध करून पंचनामा करण्याचे काम तलाठी व ग्रामसेवकांकडे होते. त्यामुळे तलाठी आर.जी. स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार प्रभाग क्र. १ मधील असून, दोन दिवसांपूर्वी सॉफ्टवेअरमध्ये ३ नावे मिसिंग असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तहसीलदारांमार्फत निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण पाठविले आहे, अशी माहिती आर.जी. स्वामी यांनी दिली.

Web Title: The name of the aspiring candidate disappears from the voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.