१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:26+5:302021-07-19T04:13:26+5:30
या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील तडजोडपात्र प्रकरणे ठेवली जातील. फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, पाणी आकार ...
या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील तडजोडपात्र प्रकरणे ठेवली जातील. फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, पाणी आकार प्रकरणे, वेतन व त्यांची सेवाविषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपाची इतर प्रकरणे, तसेच बँकेची वसुली वादपूर्व दाखल प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवली जाणार आहेत. जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीतून निकाली काढण्याच्या उद्देशाने न्यायाधीश व वकील यांचे पॅनल संबंधितांना मदत करणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणांसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. तेव्हा ज्या न्यायालयात प्रकरणे दाखल आहेत तेथे अर्ज करावा आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व तालुका विधि सेवा समितीकडे १ ऑगस्टपूर्वी अर्ज करून माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.