छत्रपती संभाजीनगरात होणार राष्ट्रीय बियाणे परिषद
By मारोती जुंबडे | Published: December 8, 2023 06:41 PM2023-12-08T18:41:00+5:302023-12-08T18:43:17+5:30
या परिषदेचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठला यजमान पद मिळाले आहे
परभणी: भारतीय बिज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठला यजमान पद मिळाले आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. इंद्र मणी यांंनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
१२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेसाठी देशभरातील कृषि संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे उद्घाटन ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता प्रमुख पाहुणे कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते होणार असून यासाठी विशेष अतिथी म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंढे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी मनोज अहुजा, राकेश रंजन, डॉ. हिमांशू पाठक, डॉ. मंगला राय,पंकज यादव,अनुप कुमार, राहीबाई एस. पोपरे, डॉ. पी. के. सिंग,कंवल सिंह चौहान, डॉ. सी. डी. मायी, अजय राणा,डॉ. इन्द्र मणि, डॉ. एच.एस. गुप्ता, डॉ. दत्तप्रसाद वासकर, मनोज कुमार यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकर व चर्चा होणार आहे. या परिषदेचा समारोप समारंभ १३ डिसेंबर रोजी होणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा, डॉ. इन्द्र मणि,डॉ. एच. एस. गुप्ता, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.