जलवाहिनी फुटली; तीन दिवस बंद राहणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:26+5:302021-06-25T04:14:26+5:30

परभणी शहराला येलदरी येथील प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. येलदरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परभणी- जिंतूर मार्गावरील ...

The navy burst; The water supply will be closed for three days | जलवाहिनी फुटली; तीन दिवस बंद राहणार पाणीपुरवठा

जलवाहिनी फुटली; तीन दिवस बंद राहणार पाणीपुरवठा

Next

परभणी शहराला येलदरी येथील प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. येलदरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परभणी- जिंतूर मार्गावरील बोरीजवळ महामार्गाचे काम सुरू असताना २४ जून रोजी मुख्य रायझिंग जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. सध्या परभणी ते जिंतूर या महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम करत असताना जेसीबीने खोदकाम करताना गुरुवारी ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले असून, दुरुस्ती होईपर्यंत प्रभाग समिती अ व ब अंतर्गत २७ जूनपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. प्रभाग समिती क अंतर्गत काही भागांचा पाणीपुरवठा अंशतः खंडित राहील, अशी माहिती शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली.

Web Title: The navy burst; The water supply will be closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.