शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादीचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 05:48 AM2019-04-13T05:48:52+5:302019-04-13T05:49:04+5:30

मतविभाजनाची दोघांनाही भीती । काठावरचे मतदार ठरविणार निर्णायक भूमिका

NCP shocks Shivsena's fort | शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादीचे धक्के

शिवसेनेच्या गडाला राष्ट्रवादीचे धक्के

Next

३० वर्षांपासून शिवसेनेचा गड असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी ताकदीने चढाई केली असून, हा गढ ताब्यात घेण्यासाठी प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून जोरदार धक्के देण्याचे काम आघाडीचे नेते करीत आहेत़


शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळून देण्याची किमया साधणाऱ्या परभणी लोकसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा संजय जाधव शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत तर गेल्या चार निवडणुकांमध्ये सातत्याने सेनेकडून पराभव स्वीकारणाºया राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी राजेश विटेकर निवडणूक लढवित आहेत़ आतापर्यंतच्या निवडणुकांपेक्षा यावेळची निवडणूक शिवसेनेची कठीण परीक्षा घेणारी ठरत आहे़ महायुती असली तरी उमेदवार संजय जाधव प्रचाराच्या मैदानात मात्र एकटेच उतरल्याचे दिसून येत आहे़ त्यांना शिवसेना आणि भाजपातील काही नेत्यांकडून अद्यापही म्हणावी तशी साथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे मुंबईतील सेना नेत्यांची परभणीत ये-जा वाढली आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारात आघाडीच्या नेत्यांची फौज उतरली असून, त्यांच्याकडून ताकदीने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे़ माजी खा़ गणेश दुधगावकर हे मात्र पक्षाच्या प्रचारात कुठेही दिसून येत नाहीत़ गेल्या चार निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काठावरच्या आणि नव मतदारांमुळे पराभव झालेला आहे़ त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर राहू नये, या दृष्टीकोणातून राष्ट्रवादीकडून नव मतदारांच्या संपर्कासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे़ यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे़ शिवाय शैक्षणिक संस्थांचे माध्यमही या कामी वापरले जात आहे़


या दोन्ही उमेदवारांच्या स्पर्धेत वचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खानही उतरल्याने तिरंगी लढतीत मतविभाजनाची भीती दोन्ही पक्षांना वाटू लागली आहे़ त्यामुळे पडद्यामागे हालचाली करून आपल्या मतपेटीला वंचित आघाडीचा कमी फटका कसा बसेल? याची काळजी राष्ट्रवादी व शिवसेनेकडून घेतली जात आहे़ शिवाय स्पर्धकाच्या व्होट बँकेला सुरूंग लावू शकतील अशा बºयापैकी मते घेणाºया इतर उमेदवारांनाही पाठबळ देण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून सुरू आहे़

परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेना मजबूत स्थितीत असून, पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी देशपातळीवर केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास दृढ झाला आहे़ शिवाय मित्र पक्षांची मोलाची साथ मिळत असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित आहे़
- संजय जाधव, शिवसेना

शिवसेना खासदारांच्या कार्य पद्धतीला जनता कंटाळली असून, धार्मिक व भावनिक मुद्यांना थारा न देता जनतेला विकास हवा आहे़ त्यामुळे वडीलधारी मंडळी, तरुण, माता भगिनी या सर्वांचा आपणाला प्रतिसाद मिळत असल्याने परभणी मतदार संघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस इतिहास घडवेल़
- राजेश विटेकर, राष्ट्रवादी

Web Title: NCP shocks Shivsena's fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.