पालममध्ये गटातटाच्या वादात राष्ट्रवादीची पिछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:18 AM2021-01-20T04:18:21+5:302021-01-20T04:18:21+5:30
पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यापैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून ४५ ग्रामपंचायतमध्ये अटीतटीच्या लढती ...
पालम तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यापैकी ८ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून ४५ ग्रामपंचायतमध्ये अटीतटीच्या लढती पहावयास मिळाल्या आहेत. माजी आ. सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने गावपातळीवर आतापर्यंत एकमेकांशी लढणारे दोन गट सोबत आले होते. त्यामुळे २० ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. तर घनदाट मित्र मंडळाचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊनही अनेक गावात दोन गट एकमेकांशी भिडल्याने राष्ट्रवादीची बहुतांश ठिकाणी पिछेहाट झाली आहे. वाडी बु. ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचा जुना गटाच्या विरोधात रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे प्रभारी माधवराव गायकवाड व राष्ट्रवादीचे सखाराम गायकवाड यांच्या पॅनेलमध्ये जोरदार लढत होऊन माधवराव गायकवाड यांनी बाजी मारली आहे. आरखेड येथे शेकापचे राज्य खजिनदार भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी ९ पैकी ९ जागा घेत तिसऱ्या़ंदा ग्रामपंचायत ताब्यात घेत हॅट्रिक केली आहे. पेठपिंपळगाव येथे राष्ट्रवादीच्या गटाने स्थनिक पातळीवर आघाडी करीत सत्ता मिळवली. डिग्रस येथे भाजपाच्या सत्ताधारी गटाला बाजूला सारून राष्ट्रवादीने ८ जागा जिंकत ताबा घेतला आहे. भाजपाने नव्याने ग्रामपंचायत ताब्यात घेतल्या आहेत.