गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:19+5:302021-06-22T04:13:19+5:30

कोरोनाच्या संसर्गकाळात चोरी आणि दरोडे या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, तर अवैध गुटखा, दारूची विक्री, वाळूची चोरी हे गुन्हे ...

New faces in crime; Corona raises police headaches! | गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !

गुन्हेगारीतही नवीन चेहरे; कोरोनाने वाढविली पोलिसांची डोकेदुखी !

Next

कोरोनाच्या संसर्गकाळात चोरी आणि दरोडे या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, तर अवैध गुटखा, दारूची विक्री, वाळूची चोरी हे गुन्हे वाढले आहेत. कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रातही नवे चेहरे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, मागच्या दीड वर्षात डिजिटल व्यवहारातून खात्यातून पैसे काढून घेणे, मोबाइल फोनद्वारे फसवणूक करणे, फेसबुकवरून मित्रांच्या नावाने पैशांची मागणी करून फसवणूक करणे आणि कहर म्हणजे व्हिडिओ कॉल करून तरुणींकडून जाळ्यात ओढून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गुन्हेगारीत नवे चेहरे

का आले?

कोरोनाच्या संसर्गामुळे बंद पडलेले व्यवसाय, बेरोजगारीत झालेली वाढ.

मोठ्या शहरांतून होणारी उलाढाल ठप्प झाल्याने तेथील अपप्रवृत्तींनी छोट्या शहरांकडे घेतलेली धाव.

संचारबंदीमुळे व्यवहार बंद असल्याने डिजिटल माध्यमांचा वापर करून वाढलेल्या चोऱ्या.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार

अलीकडच्या काळात फसवणूक आणि गुन्हेगारीचे प्रकार बदलले आहेत.

त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाला खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार आहे.

Web Title: New faces in crime; Corona raises police headaches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.