नव्या वर्षापासून परभणीत हमीभावाने कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:29 AM2020-01-01T00:29:40+5:302020-01-01T00:29:56+5:30
यावर्षीच्या कापूस हंगामासाठी ६ जानेवारीपासून पणन महासंघाच्या वतीने परभणीतील गणेश अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या कापूस हंगामासाठी ६ जानेवारीपासून पणन महासंघाच्या वतीने परभणीतील गणेश अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीला सुरुवात केली जाणार आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्री करता यावी, या उद्देशाने केंद्र सुरु करण्यात आले आहे. किमान आधारभूत योजनेंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पेºयाची नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक खाते आधारखात्याशी लिंक असलेल्या पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रांसह कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांनी कापूस पीक पेºयाच्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे. एका शेतकºयाला एका वेळेस एका दिवशी ४० क्विंटलपर्यंत कापूस विक्रीसाठी आणता येईल.
ट्रक व इतर वाहनाने आणलेला कापूस स्वीकारला जाणार नाही. १२ टक्केपेक्षा जास्त आर्द्रतायुक्त कापूस स्वीकारला जाणार नाही. कापूस धाग्याची लांबी व मायक्रोनियर व्हॅल्यूनुसार भाव दिला जाईल. कापूस धाग्याची मायक्रोनियर निर्धारित मूल्यापेक्षा ०.२ ने कमी असल्यास बन्नी/ब्रह्मा, एच-४, एच-६ जातीच्या कापसाच्या हमी दरातून २५ रुपये प्रति क्विंटल व एलआरए जातीच्या कापसाच्या हमीदरातून १५ रुपये प्रति क्विंटल कपात केली जाईल. ज्या शेतकºयांना कापूस फेडरेशनला विक्री करावयाचा आहे. त्यांनी गणेश अॅग्रो इंडस्ट्रीज येथे कापूस विक्रीसाठी आणावा, असे अवााहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांनी केले आहे.