'त्याने' आकरा जणांच्या साथीने केलेले धान्य चोरीचे नऊ गुन्हे, चार आरोपींची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:25 IST2025-03-23T16:25:00+5:302025-03-23T16:25:18+5:30

धान्य, रोकड व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा १२ लाख ४४ हजार चा मुद्देमाल हस्तगत.

Nine cases of grain theft committed by 'him' along with eleven others, investigation of four accused underway | 'त्याने' आकरा जणांच्या साथीने केलेले धान्य चोरीचे नऊ गुन्हे, चार आरोपींची चौकशी सुरू

File Photo

रेवणअप्पा साळेगावकर/
सेलू (परभणी) : स्थागुशा पथकाने गुरूवारी धान्य चोरी गुन्ह्याची माहिती काढतांना गोपनिय व खात्रीशीर माहिती आधारे सेलू येथून ज्ञानेश्वर शंकर पवार यास शिताफीने ताब्यात घेतले.चौकशीत त्याने ११ जणांच्या साथीने जिल्ह्यातील धान्य चोरीच्या ९ गुन्ह्याची कबुली दिली.चार आरोपींकडून धान्य ,रोकड व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा १२ लाख ४४ हजार रूपयेचा मुद्देमाल हस्तगत केला.या चौघांची सेलू पोलिस चौकशी करीत आहे.तर स्थागशा चे पथक ८ आरोपींचा शोध घेत आहेत.
   

सोयाबीन,तूर, हळद चोरीच्या गुन्ह्याची गांर्भीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्थागुशाचे पो.नि.विवेकांंद पाटील यांना मार्गदर्शन करून गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास आदेशीत केले होते. त्यावरून स्थागुशाचे वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याची माहिती काढण्या करीता रवाना करण्यात आले.सपोनी.राजीव मुत्येपोड यांचे पथक गुरूवारी सेलू येथे दाखल झाले राजीव गांधी नगर येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने ज्ञानेश्वर शंकर पवार यास ताब्यात घेतले त्याने ११ साथीदारांची नाव सांगीतले वरून सेलू येथील सागर सुंदर काळे, कृष्णा सुंदर काळे, मिथून बापूराव काळे यांना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी सेलू ४,बोरी २,जिंतूर, चारठाणा व परभणी ग्रामीण प्रत्येकी एक अशा ९ धान्य चोरी गुन्ह्याची कबुली दिली.व ईतर ८ साथीदारांची नांवे सांगीतले.या गुन्ह्यातील १५० कट्टे सोयाबीन,८ कट्टे हळद,नगदी रोकड  १ लाख ७१ हजार  आणि गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिक अप वाहन असा १२ लाग ४४ हजार  रुपयांचा मुद्देमालासह चार आरोपींना पोलीस ठाणे सेलू येथे हजर केले आहे.शनिवारी सेलू न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची चौकशी सुरू असुन ईतर ८ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे नेतृत्वात स्थागुशा चे पो.नी.विवेकानंद पाटील,सपोनी राजीव मुत्येपोड,सेलू पो.नी.दिपक बोरसे, पोलीस हवालदार हनमंत जक्केवाड, मधूकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रिव केंद्रे, रणजीत आगळे, जमीर फारोखी, विष्णू चव्हाण, किशोर चव्हाण, संजय घुगे, हनवते, मधूकर ढवळे, सायबरचे गणेश कौटकर यांनी मिळूल केली.

Web Title: Nine cases of grain theft committed by 'him' along with eleven others, investigation of four accused underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.