करवलीच्या सरपचंपदी नितीन मानवते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:32 AM2021-02-21T04:32:58+5:302021-02-21T04:32:58+5:30
काँग्रेसच्या वतीने शिवरायांना अभिवादन बोरी : जिंतूर तालुक्यातील बाेरी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार ...
काँग्रेसच्या वतीने शिवरायांना अभिवादन
बोरी : जिंतूर तालुक्यातील बाेरी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कॉ.गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी नागसेन भेरजे, अंकुश राठोड, शेख इरशाद पाशा, शेख उस्मान, शेख मतीन, दासराव कनकुटे, केशवराव खिल्लारे, शेख इस्माईल, सुरज कनकुटे, दीपक अंबोरे यांची उपस्थिती होती.
कौसडी येथे अभिवादन
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण बकान, ज्ञानेश्वर बर्वे, अन्वर बेग, शेख नईमोद्दीन, शेख असलम, भगवान खैरे, केरबा जीवने, सचिन मोरे, अंकुश जीवने, राम मोरे, संभाजी मोरे, काशीनाथ गीरगावकर यांची उपस्थिती होती.
केंद्रीय कन्या शाळा बोरी
बोरी : येथील केंद्रीय कन्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिता विष्णू चौधरी, केंद्रप्रमुख प्रकाश पांडे, मुख्याध्यापिका सीमा उप्पळकर यांची उपस्थिती होती. श्रीकांत दायमा यांनी सूत्रसंचालन केले. तर बनसोडे यांनी आभार मानले.
मयूर आश्रमशाळा बोरी
बोरी : येथील मयूर अनुसूचित जाती मुला-मुलींच्या निवासी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आर. आर. उजागर, ज्ञानदेव कनकुटे आदींची उपस्थिती होती.
रोहिला पिंप्री येथे शिवजयंती साजरी
बोरी: जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आकाश ढोकर, विठ्ठल डुकरे, मयूर वसमतकर, विजय ढोकळ, विठ्ठल डुकरे, काशीनाथ गाजरे, पिंटू शेरकर, विठ्ठल ढोकर, बबलू फिसफिसे, अनंत गलांडे, कैलास लहाडे, बालाजी लहाडे यांची उपस्थिती होती.