आता गरोदर महिलांनाही लस घेता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:55+5:302021-07-07T04:21:55+5:30
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ३ लाख ८८ हजार ६७० पुरुष - २ लाख १० हजार ७८६ महिला ...
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ३ लाख ८८ हजार ६७०
पुरुष - २ लाख १० हजार ७८६
महिला - १ लाख ७७ हजार ८८४
पहिला डोस - ३ लाख १५ हजार १३५
दुसरा डोस - ७३ हजार ५३५
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी...
साधारणत: लस घेण्यासाठी गरोदर महिलांनी कोणत्याही महिन्यात प्रसूतीपूर्वी लस घेणे आवश्यक आहे. होणाऱ्या बाळाच्या काळजीसाठी व तब्येतीसाठी लसीकरण गरजेचे आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
यामध्ये ज्या महिलांना कोरोना होऊन २ महिने पूर्ण झाले, अशांनीच लसीकरण करावे. जर कोरोना होऊन २ महिने झाले नसतील तर लसीकरण करू नये.
याशिवाय लसीकरणानंतर जर ताप, अंगदुखी असा त्रास झाल्यास डाॅक्टरांच्या सल्ल्याने गोळी, औषध घ्याव्यात. आपल्या मनाने लसीकरण करू नये.
प्रत्येक महिला लस घेऊ शकते. यासाठी गरोदर असलेल्या महिलांनाही कोणतीही लस घेता येते. कोरोना झाल्यानंतर २ महिने फक्त लस घेऊ नये. ताप, अंगदुखी असा त्रास झाल्यास डाॅक्टरांना विचारुन मगच गोळ्या घ्याव्यात. - डाॅ. रमेश आहुजा.
कोविन ॲपमध्ये आता गरोदर महिलांनी लस घेण्यासाठीचा नोंदणी पर्याय उपलब्ध आहे. यामुळे याद्वारे महिलांनी नोंदणी करून लसीकरण करणे गरजेचे आहे. प्रसूती पश्चात होणारा धोका टाळण्यासाठी लस घेणे महत्त्वाचे आहे. - डाॅ. कल्पना सावंत.