न.प.चे कार्यलयीन अधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:18 AM2020-12-31T04:18:10+5:302020-12-31T04:18:10+5:30
येथील तक्रारदाराने राधाकृष्णनगरीत गट नंबर ३८/०६ मध्ये प्लाॅट खरेदी केला होता. खरेदीनंतर ३१ ऑगस्ट रोजी नगरपालिका मालमत्ता रजिस्टरमध्ये ...
येथील तक्रारदाराने राधाकृष्णनगरीत गट नंबर ३८/०६ मध्ये प्लाॅट खरेदी केला होता. खरेदीनंतर ३१ ऑगस्ट रोजी नगरपालिका मालमत्ता रजिस्टरमध्ये नोंद घेण्यासाठी अर्ज केला. वारंवार चकरा मारूनही प्लाॅटची नोंद होत नसल्याने तक्रारदाराने विचारणा केली असता कार्यालयीन अधीक्षक सुरेश सत्यनारायण मणियार यांनी पैशांची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने दाखल केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ३० डिसेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात दुपारी सापळा लावण्यात आला. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन अधीक्षक सुरेश मणियार याने तक्रारदाराकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारताच त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सुरेश मणियार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड येथील पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलीस कर्मचारी अनिल कटारे, अनिरुद्ध कुलकर्णी आदींनी केली.