आटोक्यात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:06+5:302021-02-16T04:19:06+5:30

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने आरटीपीसीआरच्या चाचण्या दुपटीने वाढविल्यानंतरही आतापर्यंत दररोज ...

The number of corona patients in custody is increasing | आटोक्यात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय

आटोक्यात असलेली कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय

googlenewsNext

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला. विशेष म्हणजे आरोग्य विभागाने आरटीपीसीआरच्या चाचण्या दुपटीने वाढविल्यानंतरही आतापर्यंत दररोज साधारणत: १० ते १५ रुग्णांचीच नोंद होत होती. त्यामुळे नागरिक निश्चिंत झाले. सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. प्रतिबंधात्मक नियमही सैल करून हे व्यवहार बिनधास्तपणे केले जात आहेत. मात्र, अशातच दोन दिवसांपासून अचानक रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. १३ फेब्रुवारी रोजी २५२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १७ रुग्णांची नोंद झाली, तर १४ फेब्रुवारी रोजी १६८ अहवालांमध्ये २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. सोमवारी ५४६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. विशेष म्हणजे, ७ फेब्रुवारी रोजी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४७ होती. ती आता ११४ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार १२० रुग्ण नोंद झाले असून, त्यापैकी ७ हजार ६८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. ११४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

Web Title: The number of corona patients in custody is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.