कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:13 AM2020-12-27T04:13:13+5:302020-12-27T04:13:13+5:30

परभणी : जिल्ह्यात शनिवारी २२ रुग्णांची नोंद झाली असून मागील आठवड्यातील दररोजच्या रुग्णांच्या तुलनेत संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे ...

The number of corona patients increased | कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली

Next

परभणी : जिल्ह्यात शनिवारी २२ रुग्णांची नोंद झाली असून मागील आठवड्यातील दररोजच्या रुग्णांच्या तुलनेत संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे उपचार घेणाऱ्या १६ रुग्णांना लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली आहे.

दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. मागील आठवडाभरात सरासरी १५ ते १६ रुग्णांची नोंद होत होती. मात्र, शनिवारी २२ रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाला ५७१ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ३०५ अहवालात १५ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ५५६ वर पोहोचली आहे. त्यातील ७ हजार १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परभणी जिल्ह्याचा रहिवासी असलेला आणि परजिल्ह्यात मृत्यू पावलेल्या रुग्णाची नोंद जिल्ह्याच्या यादीत घेण्यात आली आहे.

शनिवारी दिवसभरात परभणी शहरातील रामकृष्णनगर येथील ६४ वर्षीय महिला, जिंतूररोड भागातील ५१ वर्षीय पुरुष, जुना पेडगाव रोड भागातील ४३ वर्षीय पुरुष, उघडा महादेव परिसरातील २४ वर्षीय युवक, रचनानगर भागातील ४८ वर्षीय पुरुष, गजानननगरातील ५५ वर्षीय पुरुष, रंगनाथनगरातील २४ वर्षांचा पुरुष, तालुक्यातील असोला येथील ४० वर्षीय पुरुष, ३५ वर्षांची महिला, पिंगळीरोड भागातील ६० वर्षांचा पुरुष, पिंगळी येथील ६० वर्षांचा पुरुष, ४८ वर्षांचा पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे मानवत शहरातील शाहूनगर येथील ६२ वर्षांची महिला, तालुक्यातील ६४ वर्षांचा पुरुष, तालुक्यातील केकरजवळा येथील ८० वर्षांचा वृद्ध, सेलू शहरातील विद्यानगर येथील ६५ वर्षांचा पुरुष, शास्त्रीनगर येथील ५३ वर्षांचा पुरुष, पाथरी तालुक्यातील रामपुरी येथील ३१ वर्षांची युवती, जिंतूर तालुक्यातील इटोली येथील १४ वर्षांचा मुलगा आणि ३९ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच हिंगोली शहरातील पांगरीनगर येथील ५४ वर्षांची महिला परभणीत कोरोनाबाधित झाली आहे.

Web Title: The number of corona patients increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.