उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेपाचशेपेक्षा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:13 AM2021-06-17T04:13:27+5:302021-06-17T04:13:27+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५४२ पर्यंत कमी झाली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी ...
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५४२ पर्यंत कमी झाली आहे. त्याचप्रमाणे बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
मागच्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग घटला. मात्र, बाधित रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याने काहीशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाला २ हजार ८०६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार २०४ अहवालात १९ आणि रॅपिड टेस्टच्या ६०२ अहवालात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ६० हजार ५४८ झाली असून, ४८ हजार ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २६७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ५४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
१९७ रुग्णांना सुटी
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. दोन दिवसांपासून शंभरपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. बुधवारी १९७ रुग्णांना सुटी देण्यात आली.