गव्हासाठी पोषक ठरले वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:54+5:302020-12-22T04:16:54+5:30
पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी परभणी : येथील नानलपेठ भागात भरत असलेल्या शनिवार बाजारासाठी पर्यायी जागा देण्याचा ठराव महानगरपालिकेच्या ...
पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी
परभणी : येथील नानलपेठ भागात भरत असलेल्या शनिवार बाजारासाठी पर्यायी जागा देण्याचा ठराव महानगरपालिकेच्या सभागृहात मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे. शनिवार बाजार परिसरात प्रत्येक शनिवारी बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेता, हा बाजार इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.
प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी
परभणी : जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असून, रेल्वे प्रशासनानेही प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करुन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. सध्या केवळ विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्याअंतर्गत अथवा शेजारी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तेव्हा प्रवाशी रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून जोर धरत आहे.
ग्रामीण रस्त्यांच्या कामांना मिळेना निधी
परभणी : कोरोनाच्या संकटानंतर जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांची कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
प्लास्टिक वापरावर लागेना निर्बंध
परभणी : जिल्ह्यात प्लास्टिकच्या वापरावर अद्यापही पूर्णत: निर्बंध लागले नाहीत. विशेषत: ग्रामीण भागात प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंचा सर्रास वापर सुरू आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. कारवाई होत नसल्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा आणि पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे.
शहरात अस्थायी अतिक्रमण वाढली
परभणी : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला अस्थायी अतिक्रमणे वाढली आहेत. तात्पुरत्या स्वरुपातील ही अतिक्रमणे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. स्टेशन रोड, डॉक्टरलेन यासह बाजारपेठ भागात ही अतिक्रमणे वसवली जात आहेत. मनपा प्रशासनाने वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवावित, अशी मागणी होत आहे.