नायलॉनचा मांजा दुकानांतून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:12+5:302021-01-03T04:18:12+5:30

परभणी : शहरासह जिल्ह्यात यावर्षी अद्यापही पतंग उडविण्यास प्रारंभ झाला नसून, विक्रेत्यांकडेही नायलॉनचा मांजा उपलब्ध नसल्याची माहिती शनिवारी ...

Nylon cats banished from shops | नायलॉनचा मांजा दुकानांतून हद्दपार

नायलॉनचा मांजा दुकानांतून हद्दपार

Next

परभणी : शहरासह जिल्ह्यात यावर्षी अद्यापही पतंग उडविण्यास प्रारंभ झाला नसून, विक्रेत्यांकडेही नायलॉनचा मांजा उपलब्ध नसल्याची माहिती शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली.

मकरसंक्रांतीचा सण म्हटला की पतंग उडविण्यास सुरुवात होते. पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नायलॉनच्या दोऱ्यापासून बनविलेला मांजा विक्री करण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉनचा मांजा उपलब्ध होतो का, याची पाहणी केली तेव्हा पतंग विक्रीची मुख्य दुकाने बंद असल्याचे दिसून आले. शहरातील कडबी मंडई येथील एकाच दुकानावर पतंग विक्रीसाठी उपलब्ध उपलब्ध होते. या ठिकाणी नायलॉनचा मांजा आहे का, अशी विचारणा केली असता हा मांजा आमच्याकडे विक्री होत नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. साधा दोरा आणि पतंग विक्रीसाठी ठेवले आहेत; परंतु त्यासही ग्राहक मिळत नाहीत. अद्याप शहरात हा मोसम सुरू झाला नसल्याचे विक्रेत्याने सांगितले.

सध्या पतंगबाजी सुरू नसली तरी लॉकडाऊन काळात मात्र पतंग आणि नायलॉनच्या मांजाला जिल्ह्यात मोठी मागणी होती. चार महिन्यांच्या कालावधीत परभणी शहरासह जिल्हाभरात जागोजागी पतंग उडविण्यात आले. या काळात नायलॉनचा मांजा शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पोलीस प्रशासनाने नायलॉनचा मांजा विक्री करण्यास बंदी असल्याचे जाहीर केले; परंतु कारवाई मात्र कुठेही झाली नाही.

परभणीत सायकलस्वार जखमी

लॉकडाऊनच्या ४ महिन्यांच्या काळामध्ये पतंगाचा मांजा अडकून एक सायकलस्वार जखमी झाल्याची घटना शहरात घडलेली आहे. त्याचप्रमाणे पतंग उडवित असताना एका विद्यार्थ्याचा गच्चीवरून पडून मृत्यू झाल्याची घटनाही शहरात नोंद झाली आहे. सेलू, पूर्णा तालुक्यातही पतंगाच्या मांजामुळे जखमी होण्याची घटना घडलेल्या आहेत.

७० ते ८० पक्ष्यांचा मृत्यू

पतंग उडविण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरल्याने त्याचा सर्वाधिक धोका पक्ष्यांना आहे. लॉकडाऊनच्या चार महिन्यांच्या कालावधीत ७० ते ८० पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यामध्ये या काळात चार पक्षी जखमी झाले होते. त्यांना आपण जीवदान दिल्याचेही उरटवाड यांनी सांगितले.

Web Title: Nylon cats banished from shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.