वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:46+5:302021-04-09T04:17:46+5:30
ग्रामस्थांची कामे ठप्प परभणी : कोरोनाच्या संकटामुळे शासकीय कार्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे ठप्प आहेत. सद्य:स्थितीला काही ...
ग्रामस्थांची कामे ठप्प
परभणी : कोरोनाच्या संकटामुळे शासकीय कार्यालये बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे ठप्प आहेत. सद्य:स्थितीला काही कार्यालये केवळ ५० टक्के कर्मचारी उपस्थितीवर चालविली जातात. त्याचाही परिणाम होत आहे.
झाडे लावण्यास फाटा
परभणी : येथील स्टेडियम कॉम्प्लेक्ससमोर उभारण्यात आलेल्या रस्त्यावरील दुभाजकात झाडे लावण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर भकास झाला आहे. मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
विक्रेत्यांची गैरसोय
परभणी : सवारी रेल्वे गाड्या सुरू झाल्या नसल्याने तालुकास्तरावरील लघू विक्रेत्यांची गैरसोय झाली आहे. या विक्रेत्यांना परभणीत येण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. परिणामी आर्थिक नुकसान होत आहे.
भूजल पातळीत घट
परभणी : जिल्ह्यात भूजल पातळीत घट झाली असून, ग्रामीण भागात आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पालम, गंगाखेड, पूर्णा या तालुक्यात पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.