तपासण्या वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काढली फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:45+5:302020-12-24T04:16:45+5:30

परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन जनजागृती फेरी काढण्यात आली. ...

Officers took out rounds to increase investigations | तपासण्या वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काढली फेरी

तपासण्या वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी काढली फेरी

Next

परभणी : जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये परभणी जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासण्यांची संख्या कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या तपासण्या वाढविण्यासाठी जनजागृती फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयापासून या फेरीला प्रारंभ झाला. जिंतूररोडवरील जाम नाका, जिल्हा सामान्य रुग्णालयमार्गे शिवाजी चौकापर्यंत ही फेरी काढण्यात आली. आरटीपीसीआर चाचणीस घाबरु नये, आपली तपासणी करुन घ्यावी, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे फलक हातात घेऊन अधिकारी, कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते.

प्रत्येक रुग्णाची तपासणी करा : टाकसाळे

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या तपासण्या कमी आहेत. त्या तुलनेने मृत्यू दर अधिक आहे. त्यामुळे आरटीपीसीआर तपासण्या वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे शिवानंद टाकसाळे यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कुटुंबीयांची आरटीपीसीआर तपासणी करुन घ्यावी, अशा सूचना टाकसाळे यांनी केल्या. या कार्यशाळेस महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, ओमप्रकाश यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस. नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकर देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. खंदारे, डॉ.किशोर सुरवसे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Officers took out rounds to increase investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.