गंगाखेड येथील महिला हत्ये प्रकरणात एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:56 PM2018-03-15T13:56:16+5:302018-03-15T13:56:48+5:30
शहरातील एका महिलेवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१४ ) दुपारी उघडकीस आली होती.
गंगाखेड (परभणी ) : शहरातील एका महिलेवर अतिप्रसंग करून तिची हत्या केल्याची घटना बुधवारी (दि.१४ ) दुपारी उघडकीस आली होती. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून काल मध्यरात्री परळी नाका येथून एकास अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी दुपारी शहरातील सोमवारपासून बेपत्ता असलेल्या राजकन्या ज्ञानेश्वर सोळंके यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यावर अतिप्रसंग करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कडब्याच्या गंजीत जाळण्यात आला होता. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ माधव जाधव (रा.राणीसावरगाव) याने दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर जाधव ( रा. मोहळा ता. सोनपेठ ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर मधुकर हा मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील परळी नाका परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यावरून त्यांनी सापळा रचुन मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास मधुकरला ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नारायणराव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सोहन माछरे, सपोनि. सुरेश थोरात, पो.उप.नि. भाऊसाहेब मगरे, स्थागुशाचे सुरेश डोंगरे, शेख मोबीन, गणेश कौटकर, राजेश आगाशे, डीबी पथकातील प्रकाश रेवले, मानेबोईनवाड, प्रल्हाद मुंडे, निलेश जाधव, शेख जिलानी, राजकुमार बंडेवाड, विष्णु वाघ, श्रीकृष्णा तंबुर यांनी केली.