पोलीस चौकीवर फुलांची सजावट करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 07:50 PM2021-02-23T19:50:40+5:302021-02-23T19:51:18+5:30

राणीसावरगाव पोलीस चौकीच्या लोकापर्ण करण्याआधी झाला अपघात

One dies of electric shock while decorating flowers at a police outpost | पोलीस चौकीवर फुलांची सजावट करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

पोलीस चौकीवर फुलांची सजावट करताना विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Next

गंगाखेड: तालुक्यातील राणीसावरगाव येथील पोलीस चौकीच्या इमारतीवर फुलांची सजावट करतांना विद्युतवाहिनीला स्पर्श झाल्याने एका फुल व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. संतोष विठ्ठलराव शिंदे असे मृत व्यापाऱ्याचे नाव असून ही घटना मंगळवारी ( दि. २३ ) सकाळी ९:४० वाजेच्या सुमारास घडली.

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी पोलीस ठाण्याचे हद्दीतील राणीसावरगाव येथील नूतन पोलीस चौकीचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होते. यामुळे इमारतीवर सकाळी ९:४० वाजेच्या सुमारास फुल व्यवसायिक संतोष विठ्ठलराव शिंदे हे सजावट करीत होते. दरम्यान, इमारतीवरुन जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीला त्यांचा स्पर्श झाला. यामुळे विजेचा जबर धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच भाऊ सतिश शिंदे, राहुल बनाटे, बालाजी जाधव, ओमकार डोणे, प्रदीप जाधव, गणेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे आदींनी त्यांना उपचारासाठी राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगी, दोन मुलं असा परिवार आहे. वृत्त समजताच राणीसावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: One dies of electric shock while decorating flowers at a police outpost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.