जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत दीडशे टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:02+5:302021-07-14T04:21:02+5:30
या वर्षीच्या खरीप हंगामात मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, चालू आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. मागील तीन ...
या वर्षीच्या खरीप हंगामात मागील आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, चालू आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. मागील तीन दिवसांपासून तर सतत पाऊस होत असल्याने अनेक भागात नुकसानही झाले आहे. आतापर्यंत २३७ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत ३७५ मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १५८ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१ मिमी असून आतापर्यंत पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४३५ मिमी पाऊस झाला. तसेच परभणी ४३०, गंगाखेड ३१४, जिंतूर ३५४, पाथरी ३७४, पालम ३४६, सेलू ३४१, सोनपेठ ४०४ आणि मानवत तालुक्यात ३४६ मिमी पाऊस झाला आहे.
सोमवारी दिवसभरात सरासरी १९.८ मिमी पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे. त्यात गंगाखेड तालुक्यात २५.९, परभणी २१.६, पाथरी १५.९, जिंतूर १९, पूर्णा २५, पालम १०.७, सेलू २१.३, सोनपेठ २९.३ आणि मानवत तालुक्यात ८.४ मिमी पाऊस झाला आहे.