शिवजयंती महोत्सवाच्या निधीतून शहीदांच्या कुटूंबियांना एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 07:38 PM2019-03-04T19:38:21+5:302019-03-04T19:40:18+5:30
संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मदत
जिंतूर (परभणी) : जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटूंबियांना ३ मार्च रोजी संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे़
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलडाणा येथील चोरपांगरा येथील नितीन राठोड हे शहीद झाले होते़ तर मलकापूर येथील नितीन राठोड यांना विरमरण आले होते़ यात दोन्ही कुटूंबियांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश कुटूंबियांकडे सुपूर्द केला़ यावेळी बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे, अॅड़ विनोद राठोड, ज्ञानेश्वर रोकडे, दीपक डोंबे, विजय भांबळे, सोपान धापसे, गोपाळ शिंदे, सचिन डोईफोडे, कृष्णा देशमुख, अनिल दाभाडे, प्रशांत हराळ, सौरभ घुगे आदींची उपस्थिती होती.