आखाड्यावर दरोडा टाकून एक लाखाचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:51+5:302020-12-24T04:16:51+5:30

पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणीसावरगाव शिवारात मारोती आडे व जालिंदर आडे (रा. घाटेवाडी) यांचा शेत आखाडा आहे. २१ डिसेंबर ...

One lakh was looted by robbing the arena | आखाड्यावर दरोडा टाकून एक लाखाचा ऐवज पळविला

आखाड्यावर दरोडा टाकून एक लाखाचा ऐवज पळविला

Next

पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राणीसावरगाव शिवारात मारोती आडे व जालिंदर आडे (रा. घाटेवाडी) यांचा शेत आखाडा आहे. २१ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आठ ते दहा जणांनी आखाड्यावर दरोडा टाकला. यावेळी अनुसयाबाई दत्तराव आडे, केराबाई प्रकाश राठोड, संजय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. यात तिघेही जखमी झाले आहेत. दरोडेखोरांनी २० हजार रुपयांचे सोन्याचे झुंबर, ५२ हजार रुपये किमतीची बोरमाळ, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ, २० हजार रुपयांचे चांदीचे कडे, १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या कोपऱ्या, चांदीची पाटली (१० हजार रुपये), असा एकूण १ लाख ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. नातेवाईक आखाड्यावर दाखल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तीनही जखमींना राणीसावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. दरोड्याच्या घटनेमुळे परिसरातील शेत आखाड्यांवर भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One lakh was looted by robbing the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.