पाथरी येथे कार-दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:59 PM2018-08-03T18:59:35+5:302018-08-03T19:00:00+5:30

शहरातील राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कार चालकाने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

One seriously injured in a car-bike accident at Pathri | पाथरी येथे कार-दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी 

पाथरी येथे कार-दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी 

googlenewsNext

पाथरी (परभणी ) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कार चालकाने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी १०. ३० वाजता घडली. 

राष्ट्रीय महामार्गावर पोखरणी फाट्यापर्यंत दुभाजक बसविण्यात आले आहेत. तसेच सेलू कॉर्नर परिसरात रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे.  त्यामुळे बऱ्याच वेळा परभणीकडे जाणारी वाहने विरुद्ध दिशेने वाहतूक करतात. आज सकाळी याच मार्गावर एक कार विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत होती. यावेळी पोखरणी मार्गावरून येणाऱ्या दुचाकीस कार ने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कार रस्त्यावरील दुभाजकावर चढली. 
अपघातात दुचाकीस्वार राजेभाऊ संभाजी सुरवसे (४५, रा.मोठेवाडी,  ता. माजलगाव ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. 

कारमधील चालक व प्रवाश्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार यांनी दिली.

Web Title: One seriously injured in a car-bike accident at Pathri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.