गंगाखेड तालुक्यात आर्थिक विवंचनेला कंटाळुन एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 04:29 PM2018-12-21T16:29:04+5:302018-12-21T16:29:49+5:30
मागील काही दिवसांपासून माणिक सोळंके यांना हाताला काम मिळत नव्हते.
गंगाखेड (परभणी ) : हाताला काम मिळत नसल्याने निर्माण झालेल्या गरिबी व हलाखीच्या परिस्थितीला कंटाळुन धारासूर येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. माणिक अमरनाथ सोळंके ( ५०) असे मृताचे नाव असून गुरुवारी (दि. २०) रात्री तालुक्यातील धारासुर येथे ही घटना घडली.
मागील काही दिवसांपासून माणिक सोळंके यांना हाताला काम मिळत नव्हते. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत सोळंके असायचे. यातूनच गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पो.ना. रामभाऊ तांदळे, महेश कवठाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी जगन्नाथ माणिकराव सोळंके यांनी दिलेल्या जबाबावरून सोनपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढिल तपास जमादार वशिष्ठ भिसे, पो. ना. रामभाऊ तांदळे हे करत आहे. सोळंके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, तीन विवाहित मुली, नातवंड असा परिवार आहे.