एक शिक्षक अनेक खेळाडू घडवतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:14 AM2021-01-04T04:14:55+5:302021-01-04T04:14:55+5:30
सेलू:- एक शिक्षक तयार झाला तर अनेक खेळाडू निर्माण करू शकतो. निरोगी राहण्यासाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ...
सेलू:- एक शिक्षक तयार झाला तर अनेक खेळाडू निर्माण करू शकतो. निरोगी राहण्यासाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले.
कै. श्रीरामजी भांगडिया यांच्या जयंतीनिमित्त २ जानेवारी रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्थाअंतर्गत शिक्षकांच्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विनोद बोराडे बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक वानरे तर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची उपस्थिती होती. उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, उपमुख्याध्यापक रामकिशन मखमले, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, प्राचार्य नरेंद्र पाटील, गिरीष लोडाया आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक वानरे यांनी तर सूत्रसंचालन काशीनाथ पल्लेवाड केले.
स्पर्धेत नूतन शिक्षण संस्थेतील पाच घटकातील २५ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेस पंच म्हणून प्रा. महेश कुलकर्णी व सुरज शिंदे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी. डी. सोन्नेकर, सतीश नावाडे, विरेश कडगे, कुशल कडे, सचिदानंद डाखोरे, संतोष क्षीरसागर, संभाजी रोडगे, गजानन मुळी, महेश हजारे, प्रसाद कांयदे, केशव डाहाळे, मंचक घायाळ, अरुण रामपुरकर यांनी परिश्रम घेतले.