जिल्ह्यात दिवसभरात केवळ १ हजार ३३५ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:22 AM2021-08-14T04:22:26+5:302021-08-14T04:22:26+5:30
परभणी शहरात मागील पंधरा दिवसांपासून मनपाचे लसीकरणही संथगतीने होत आहे. मनपाच्या केंद्रांना कोविशिल्ड लसीचा साठा मागूनही उपलब्ध झाला नव्हता. ...
परभणी शहरात मागील पंधरा दिवसांपासून मनपाचे लसीकरणही संथगतीने होत आहे. मनपाच्या केंद्रांना कोविशिल्ड लसीचा साठा मागूनही उपलब्ध झाला नव्हता. यामुळे मागील १५ दिवसांपूर्वीच्या मनपाच्या लसीकरण केंद्रांची संख्या १६वरून थेट ९वर आली आहे. यानंतर मागील ३ दिवसात कोव्हँक्सिन लसीचा पुरवठाही कमी झाल्याने केवळ ३ ते ४ केंद्रांवर लसीकरण प्रक्रिया पार पडली. शनिवारी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे डोस मनपा क्षेत्रात मिळणार असल्याचे समजते. यामुळे मागील पंधरा दिवसांपासून ताटकळत असलेल्या लाभार्थ्यांची शनिवारी सर्वच केंद्रांवर गर्दी होऊ शकते. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ८३ हजार ८४७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, तर पहिला डोस ४ लाख ४१ हजार २६३ जणांनी घेतला आहे. यानंतर दुसरा डोस १ लाख ४२ हजार ५८४ जणांनी घेतला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी झाली आहे.
येथे झाले शुक्रवारी लसीकरण
सेलू उपजिल्हा रुग्णालय, पूर्णा ग्रामीण रुग्णालय, पाथरी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय परभणी, वॉर्ड क्रमांक पंधरा परभणी, बोरी ग्रामीण रुग्णालय, पालम ग्रामीण रुग्णालय, जिंतूर ग्रामीण रुग्णालय, पाथरगव्हाण आरोग्य केंद्र, धारासूर, इसाद, धर्मापुरी, दुधगाव, आवई, वाघाळा, कुपटा.